मुंबई : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षासहित सामाजिक इतर घटकांनीही टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसूजा यांची जोडी राम लक्ष्मणासारखी होती – फडणवीस
हे महाविकास आघाडी सरकार नसून महा ‘मद्यपी’ सरकार वगैरे वगैरे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी तर थेट याबाबत मोठा खुलासा केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची एका वाईन व्यवसायिकासोबत भागीदारी आहे असा आरोप सोमैया यांनी केला होता.
ज्या उमेदवाराचा रिमोट कंट्रोल कलंगुटमध्ये आहे अशा उमेदवाराला निवडून देणार का? फडणवीसांचा हल्लाबोल
या आरोपाला आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त उत्तर दिले आहे. जर आमची एखादी वायनरी असेल तर भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी ती ताब्यात घ्यावी आणि खुशाल चालवावी. आमच्या नावावर जर खरंच एखादी वायनरी आढळली तर ती नक्कीच आम्ही किरीट सोमैया यांच्या नावावर करून देण्यासाठी तयार आहोत. कोणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या गोष्टीचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमैया यांचा मुलगा का चणे फुटाणे विकतो का ? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?’ असा सवाल संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे.
शास्तीकराचा गुंता राष्ट्रवादीने वाढवाला अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या जखमेवर आता मीठ चोळले?
ते पुढे म्हणाले की, एखाद्या कंपनीत संचालक असणं हा काय गुन्हा आहे का ? महाराष्ट्रातील राजकारणाला संस्कार आणि परंपरा आहे. मात्र ती परंपरा मोडीस काढण्याचे काम भाजपने केले आहे. काही मुद्दा उचलून थेट मुलाबाळांपर्यंत जाणे हे भाजपचे कृत्य आहे. आमची मुले काही ड्रग्स तर विकत नाहीत ना, किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
Read also:
- …तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गांज्या निर्मितीची परवानगी द्या – खासदार प्रताप चिखलीकर
- निवडणूक लढविण्यासाठी बायको पाहिजे; जातीची अट नाही
- गोव्यात फडणवीस-लांडगेंचा धडाका; म्हापश्यातील शक्ती केंद्रांच्या बैठकांवर जोर
- आमदारांचे असंवैधानिक निलंबन: सर्वोच्च न्यायालयाची महाविकास आघाडी सरकारला चपराक!
- राज्यातील विरोधी पक्ष देशी पिउन बरळतोय; वाईन विक्री निर्णयावरून संजय राऊतांची भाजपवर टीका