मुंबई : काल महाराष्ट्रात विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊच्या एका चिथवणीखोर आव्हानामुळे १०वी ते १२वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा भडका उडाला होता. मोठ्या संख्येने काल मुंबईसह महाराष्ट्रात इतरही जिल्ह्यात अल्पवयीन मुलांनी आंदोलन छेडले होते. आंदोलन छेडले इतपर्यंत ठीक होतं मात्र नंतर आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बस फोडीच्या, बस जाळण्याची घटना घडल्याने सरकारलाही खडबडून जाग आली.
म्हापश्यातील कुठलाही वार्ड विकास कामांपासून वंचित राहिला आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही – वायंगणकर
त्यानंतर बऱ्याच प्रसारमाध्यमांनी हिंदुस्थानी भाऊला चर्चेसाठी आमंत्रित केले आणि तथाकथित भाऊला विचारण्यात आले की सरकारकडे तुम्ही कोणतं याआधी निवेदन दिलं होतं का ? किंवा सरकारला तुम्ही कसली मागणी केली होती का ?. त्यावर सरकार माझ्यासारख्या सामान्य माणसासोबत का चर्चा करेल असं उत्तर हिंदुस्थानी भाऊनि दिले.
“संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का? मनसेची राऊतांवर खोचक टीका
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नंतर हिंदुस्थानी भाऊशी संपर्क साधून चर्चा करण्यास या अशी भूमिका घेतली. मात्र आज सरकारतर्फे हिंदुस्थानी भाऊवर कारवाई करण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
Read also:
- नितेश राणेंची ‘त्या’ प्रकरणातून सुटका नाहीच; उद्या ३ वाजता अंतिम निर्णय होणार
- विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे – उदय सामंत
- पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची नावे जाहीर; कोणत्या भागाला काय नाव…. वाचा सविस्तर…
- शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळी आंदोलन; पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज
- खुलेआम वाईन विक्रीतून सरकार नेमकं काय साध्य करणार? अण्णा हजारेंचा सवाल