मुंबई : निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आता महविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोषारी यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. यापूर्वी विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती, विमान प्रकरण, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला नकार अशा गोष्टींवरुन राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद पाहायला मिळाला होता.
…तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गांज्या निर्मितीची परवानगी द्या – खासदार प्रताप चिखलीकर
आता ओबीसी आरक्षणावर सही करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या शक्ती विधेयकाला मंजूरी देणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आरक्षण विधेयकाला मंजूरी नाकारल्याने आता खळबळ उडाली आहे.
नितेश राणेंची ‘त्या’ प्रकरणातून सुटका नाहीच; उद्या ३ वाजता अंतिम निर्णय होणार
याविषयी राज्यातील ओबीसी नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि राज्यापाल महोदयांचा काही गैरसमज झालेला दिसत आहे. दोन्ही सभागृहांनी या विधेयकाला मंजुरी दिलेली असताना राज्यपालांनी नकार देणे बरोबर नाही. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणार आहे.
ब्रेकिंग : १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी तथाकथित हिंदुस्थानी भाऊला अटक
तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत मी भेट घेणार आहे असं देखील भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील ८ कोटी ओबीसींचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनसुद्धा आम्हाला आशा वाटते. अशा वेळी राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी ते परत पाठवणं हे काही समजलं नाही. आम्ही राज्यपालांना पुन्हा भेटून विनंती करणार आहे की, राजकारणाचं काय असेल ते वेगळं पण हा सार्वजनिक प्रश्न आहे. तुमच्या सही न करण्याने ओबीसी समाजाचे नुकसान होईल असे अडथळे निर्माण होईल असं करू नये, असेही आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले आहे.
Read also:
- 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन, ‘सेझ’चा कायदा बदलणार, शेती व्यवसयासाठी बजेटमध्ये काय?
- नितेश राणेंना मोठा धक्का; स्वीय सहाय्यकाला ४ दिवसांची कोठडी, राणेंना जेल की बेल ?
- राष्ट्रवादीच्या प्रस्थापित- आत्मकेंद्री भूमिकेमुळे प्रभाग रचनेत भाजपाचा वरचष्मा !
- भाजपाचे आजी-माजी शहराध्यक्ष म्हणतात… प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच!
- म्हापश्यात तृणमूल समर्थकांना मारहाण; काँग्रेस समर्थकांकडून हल्ल्याचा आरोप