ठाणे : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला आहे. ट्विटरवरून थेट नामर्द असा उल्लेख मागच्या काही दिवसांमध्ये शिवसेनेला डिवचण्याचे काम पूनम महाजन यांनी केले होते.
नितेश राणेंची ‘त्या’ प्रकरणातून सुटका नाहीच; उद्या ३ वाजता अंतिम निर्णय होणार
त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील त्याच आक्रमतेने शिवसेनेला उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा पूनम महाजन यांनी भाषणातून शिवसेनेबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक काल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना पूनम महाजन यांनी शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा असं म्हटलं आहे. यामुळे शिवसेना आता आक्रमक भूमिका घेऊ शकते.
ब्रेकिंग : १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी तथाकथित हिंदुस्थानी भाऊला अटक
महाजन म्हणाल्या, २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत दगाबाजी केल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर दोन वर्ष कोरोना महामारी आली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात टाहो फोडायला सुरुवात केली. पण, कोरोनाकाळात फक्त भाजपचे कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला धावून गेले होते. त्यावेळी कोणीही पुढे आले नव्हते. शिवसेनेचा एकही शाखाप्रमुख रस्त्यावर दिसला नव्हता. मुख्यमंत्री तर घरात बसून होते, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले.
म्हापश्यात तृणमूल समर्थकांना मारहाण; काँग्रेस समर्थकांकडून हल्ल्याचा आरोप
नळावर पाण्यासाठी भांडल्यासारखे ट्विटरवर भांडायचे, हे मला पटत नाही. शिवसेनेच्या विरोधात बोलायचे नाही, अशी सूचना मी कधीही कार्यकर्त्यांना दिली नाही. मी तर म्हणते एकेकाला ठोका, सोडू नका, असे म्हणत भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी शिवसेनेबाबत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. आता शिवसेना याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी सही नाकारली; राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष टोकाला
- 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन, ‘सेझ’चा कायदा बदलणार, शेती व्यवसयासाठी बजेटमध्ये काय?
- नितेश राणेंना मोठा धक्का; स्वीय सहाय्यकाला ४ दिवसांची कोठडी, राणेंना जेल की बेल ?
- राष्ट्रवादीच्या प्रस्थापित- आत्मकेंद्री भूमिकेमुळे प्रभाग रचनेत भाजपाचा वरचष्मा !
- भाजपाचे आजी-माजी शहराध्यक्ष म्हणतात… प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच!