औरंगाबाद : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षासहित इतर सामाजिक घटकांनीही टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
म्हापश्यात तृणमूल समर्थकांना मारहाण; काँग्रेस समर्थकांकडून हल्ल्याचा आरोप
हे महाविकास आघाडी सरकार नसून महा ‘मद्यपी’ सरकार वगैरे वगैरे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आपली संतप्त भूमिका या निर्णयाविरोधात मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सत्ताधारी सर्व पक्षांनी हिंमत असेल तर औरंगाबादमध्ये किराणा दुकान किंवा इतर सुपर शॉपीमध्ये वाईन विक्री करण्यास सुरुवात केली तर ते दुकान फोडून टाकण्याची जबाबदारी माझी असेल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
भाजपाचे आजी-माजी शहराध्यक्ष म्हणतात… प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच!
इम्तियाज जलील म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मी आव्हान देतो. तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादमध्ये कोणत्याही किराणा दुकान किंवा सुपर शॉपीत वाईन शॉप उघडून दाखवा.
राष्ट्रवादीच्या प्रस्थापित- आत्मकेंद्री भूमिकेमुळे प्रभाग रचनेत भाजपाचा वरचष्मा !
किराणा दुकानात एक जरी वाईन शॉप सुरू झालं तर मी स्वतः आणि माझे कार्यकर्ते ते दुकान फोडणार . इतकंच नाही तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला आणि माझ्या आया-बहिणींनी जिथं किराणा दुकानात वाईन दिसेल ते दुकान फोडा असं आव्हान देखील जलील यांनी केलं आहे. वाईन विक्री करण्याची ही फक्त पहिली पायरी आहे. वाईन नंतर ते कधी दारू विकायला सुरुवात करतील हे कळणारही नाही. उद्या याच लहान मुलांच्या हातात बिअर बॉटल्स दिसणार आणि याच मुलांच्या हातात विस्कीची बॉटल दिसेल, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.
Read also:
- राष्ट्रवादीचे नगरसेवक घाबरल्याने सोयीस्कर प्रभाग रचना? औंध, बाणेर, बालेवाडीतील सर्वपक्षीय इच्छुकांचा संताप
- शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा; खासदार पूनम महाजन
- ओबीसी विधेयकावर राज्यपालांनी सही नाकारली; राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष टोकाला
- 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन, ‘सेझ’चा कायदा बदलणार, शेती व्यवसयासाठी बजेटमध्ये काय?
- नितेश राणेंना मोठा धक्का; स्वीय सहाय्यकाला ४ दिवसांची कोठडी, राणेंना जेल की बेल ?