सिंधुदुर्ग : नितेश राणे यांच्यासंदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. राणेंना सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ दिलासा दिला होता. मात्र पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. यानंतर राणेंना दहा दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर राणेंनी शरणागती पत्कारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा जामीनाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण खपवून घेणार नाही; अंकिता पाटलांचा दत्तात्रय भरणेंना इशारा
दिवसभरात कोर्टात उहापोह झाल्यानंतर नितेश राणेंनी शरणागती पत्कारणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेऊन मी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसरकाने बेकायदेशीरपणे मला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करत असल्याचं राणेंनी म्हटलंय.
शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या भाजपाचे आमदार नितेश राणे न्यायलयाच्या फेऱ्या मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना शरण येण्याचा एकमेव मार्ग उरला होता. अखेर त्यांनी तो पत्कारल्याचं दिसतंय.
मोठी बातमी: नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टात शरण जाणार, राणेंची गाडी न्यायालयाच्या दिशेने रवाना
याआधील जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने ते जामीनसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र उच्च न्यायालयासमोरील अर्जही निवेदनासह मागे घेण्यात आला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाकडून अजून 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही अर्जदाराच्या चौकशीला सामोरे जायचे असल्याने तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ते आता अधिकाऱ्यांना शरण जाणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Read also:
- प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार: विधानसभा प्रभारींची आक्रमक भूमिका
- खासदार संजय राऊतांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणात निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक
- मुंबईत पेगाससवरुन भाजप आणि काँग्रेस आमने सामने; आमदार लाड आणि पोलिसांत झटापट
- समीर वानखेडेंना महाविकास आघाडी सरकारचा दणका; बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
- गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा; रोहन खंवटे यांचे आवाहन