ठाणे : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला आहे. ट्विटरवरून थेट नामर्द असा उल्लेख मागच्या काही दिवसांमध्ये शिवसेनेला डिवचण्याचे काम पूनम महाजन यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील त्याच आक्रमतेने शिवसेनेला उत्तर दिले होते. राऊतांच्या उत्तराला पूनम महाजन यांनी भाषणातून उत्तर देताना म्हटलं होतं कि शिवसैनिकांना ठोकून काढू. हे वक्तव्य त्यांनी मुंबईत आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते.
मुंबईत पेगाससवरुन भाजप आणि काँग्रेस आमने सामने; आमदार लाड आणि पोलिसांत झटापट
पूनम महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत पूनम महाजन यांच्याविरोधात बॅनरबाजी केली आहे. “आपणं यांना पाहिलंत का ? माननीय खासदार हरवल्या आहेत !” असे बॅनर लावून युवासेनेकडून त्यांची खिल्ली उडवली आहे. या बॅनरमुळे भाजप सेना कार्यकर्ते एकमेकांत भिडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या बॅनरवर खमंग राजकीय चर्चा मातोश्रीच्या अंगणात सुरू आहे.
खासदार संजय राऊतांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणात निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक
मागील काळात शिवसेनेच्या विरोधात घेलेल्या भूमिकेमुळे शिवसैनिकांनी बॅनरबाजी करून या सगळ्याचा वचपा काढला आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती. त्यावेळी पूनम महाजन यांनी शिवसेनेच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना तिकीटही देण्याबाबत साशंकता होती.
तेव्हा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने पूनम महाजन यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसैनिकांना डिवचल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. यावेळी तर भाजप शिवसेना युती नाही. त्यातच पूनम महाजन या गेल्या कित्येक दिवसांपासून लोकसभा क्षेत्रात फिरकला देखील नाहीत. त्यामुळे शिवसेना त्यांना नक्कीच अडचणीत आणणार असं काहीसं वातावरण आहे असं देखील बोललं जातं आहे.
Read also:
- समय बडा बलवान होता है; कोठडीत जाण्यापूर्वी ट्विटकरत नितेश राणेंचा शिवसेनेला गंभीर इशारा
- सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचे सुचक वक्तव्य
- युतीच्या चर्चेत पडू नका, स्वबळावर लढायचयं, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा – राज ठाकरे
- मुंबईत राज ठाकरेंची मनसैनिकांसोबत बैठक; बुलढाण्यात तब्बल २८ पदाधिकाऱ्यांचा पक्षाला ‘रामराम’
- भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा?