मुंबई : मुंबईसह राज्यातल्या 15 हून अधिक महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजप, मनसे यांच्यासह सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मनसेने आधी त्यांचं पक्षचिन्ह असलेल्या इंजिनाची दिशा बदलली. त्यानंतर झेंड्याचा रंगही बदलला. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांची युती होईल अशी चर्चा रंगली आहे. भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसेनेही कंबर कसली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मोठी बातमी: नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टात शरण जाणार, राणेंची गाडी न्यायालयाच्या दिशेने रवाना
मुंबईतल्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी मनसे समिती स्थापन करणार असून, त्या समितीवर तिथल्या इच्छुकांचा आणि एकूणच परिस्थिचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी असेल. राज ठाकरे स्वतः लोकसभा क्षेत्रनिहाय मेळावे घेणार आहेत. गेल्या काही निवडणुकांत मनसेला जेमतेम भोपळा फोडण्याइतपतच यश मिळालं. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरणार हे पहावं लागणार आहे.
गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा; रोहन खंवटे यांचे आवाहन
भाजपसोबत जायचं की नाही या चर्चेत न पडता सगळ्यांनी तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढायची तयारी ठेवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा असंही त्यांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशमुळे मनसे राज्यभरातील पालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही स्वबळाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
समीर वानखेडेंना महाविकास आघाडी सरकारचा दणका; बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
महापालिका निवडणुकीत मनसे कोणती रणनीती आखणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 2012 च्या निवडणुकीत मनसेनं मुंबई, नाशिक, कल्याण डोंबिवली आणि पुण्यात लक्षवेधी कामगिरी केली होती. नाशिक महापालिकेत तर सत्ताही मिळवली होती. पण 2014 पासून मनसेच्या यशाला उतरती कळा लागली. त्यातून पक्ष अद्यापही सावरलेला नाही. आता सगळी मरगळ झटका आणि कामाला लागा. युतीच्या चर्चेत पडू नका असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
Read also:
- मुंबईत राज ठाकरेंची मनसैनिकांसोबत बैठक; बुलढाण्यात तब्बल २८ पदाधिकाऱ्यांचा पक्षाला ‘रामराम’
- भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा?
- प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार: विधानसभा प्रभारींची आक्रमक भूमिका
- खासदार संजय राऊतांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणात निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक
- मुंबईत पेगाससवरुन भाजप आणि काँग्रेस आमने सामने; आमदार लाड आणि पोलिसांत झटापट