सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
समीर वानखेडेंना महाविकास आघाडी सरकारचा दणका; बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
त्यानंतर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक होऊपर्यंत आमदार नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. काल नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईत पेगाससवरुन भाजप आणि काँग्रेस आमने सामने; आमदार लाड आणि पोलिसांत झटापट
त्यानंतर लगेचच नितेश राणे यांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून २००९ मध्ये पी. चिदंबरम गृहमंत्री असताना अमित शहा यांना कशा प्रकार अटक केली होती हे दाखवले आहे आणि नंतर १० वर्षांनंतर अमित शहा गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांना अटक केली होती असे सांगितले आहे. त्यासोबत “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” असे कॅप्शन लिहीत शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. एवढंच नाही तर शरण जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.
खासदार संजय राऊतांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणात निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक
आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर मला अटक करण्याचा प्रयत्न केला, अशी छोटीशी मात्र सूचक प्रतिक्रिया शरण येण्यापूर्वीच नितेश राणे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. नितेश राणे यांची कोठडी पोलीस मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली होती. नितेश राणे यांची कोठडीत रवानगी केल्यानंतर बराच काळ कणकवलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Read also:
- सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचे सुचक वक्तव्य
- युतीच्या चर्चेत पडू नका, स्वबळावर लढायचयं, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा – राज ठाकरे
- मुंबईत राज ठाकरेंची मनसैनिकांसोबत बैठक; बुलढाण्यात तब्बल २८ पदाधिकाऱ्यांचा पक्षाला ‘रामराम’
- भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा?
- प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार: विधानसभा प्रभारींची आक्रमक भूमिका