मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर सुरु असलेल्या कारवाईवर आज संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडीने प्रवीण राऊत यांना अटक देखील केली आहे.
एवढंच नाही तर संजय राऊत यांच्या मुलींची भागीदारी असलेल्या कंपनीचे भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही धाड टाकली आहे. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारला उद्देशून खुले आव्हान दिले आहे.
भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांनी हिंदीमध्ये एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आधी अमिष दाखवलं गेलं, ऑफर्स दिल्या. त्यानंतर घाबरवलं. पण तरीही झुकलो नाही, मग कुटुंबाला धमकावलं गेलं. मी म्हटलं, सोडून द्या, त्याकडे डोळेझाक करा त्यांच्याकडे. तर आता केंद्रीय यंत्रणांना आमच्या मागे लावले. असं चालत राहतं. आणि २०२४ जो पर्यंत केंद्रात सत्ता आहे तोपर्यंत चालतच राहील. पण आता आम्ही झुकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईत राज ठाकरेंची मनसैनिकांसोबत बैठक; बुलढाण्यात तब्बल २८ पदाधिकाऱ्यांचा पक्षाला ‘रामराम’
त्यांनी हे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील टॅग केलं आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी कवितेच्या दोन ओळी टाकत विरोधकांना इशारा दिला आहे. ‘मैं तूफानों में चलने का आदी हूँ, तुम मत मेरी मंजिल आसान करो,’ असं देखील म्हटलं आहे. प्रवीण राऊत यांना नऊ फेब्रुवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे आणि सुजित पाटकर यांच्या घरी ईडीची शोधमोहिम सुरू असल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापुर्वीही देखील राऊतांच्या पत्नीला ईडीकडून एका प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होते. राऊत यांनी गुरूवारी सकाळी ट्विट करून केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
Read also:
- पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांनी रायन ब्रागांझा घायाळ; मायकल लोबोंसमोरच झाली शाब्दिक चकमक
- आपणं यांना पाहिलंत का? माननीय खासदार हरवल्या आहेत; पूनम महाजनांविरोधात शिवसैनिकांची आक्रमक बॅनरबाजी
- समय बडा बलवान होता है; कोठडीत जाण्यापूर्वी ट्विटकरत नितेश राणेंचा शिवसेनेला गंभीर इशारा
- सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचे सुचक वक्तव्य
- युतीच्या चर्चेत पडू नका, स्वबळावर लढायचयं, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा – राज ठाकरे