मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आता सुरूवात होत आहे. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
“देवेंद्रजी…! Cool Down, तुमचा जळफळाट आम्ही समजू शकतो”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
महाराष्ट्राचं भविष्य केवळ देेवेंद्र फडणवीस बदलू शकतात. फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. 2024 मध्ये फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करू. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. असंही बावनकुळे यांनी बोलून दाखवलं आहे.
“उद्धव ठाकरेंनी आपला स्क्रिप रायटर बदलावा”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. अर्थ सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही. जागे व्हा. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही !जागे व्हा !!@mieknathshinde
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 18, 2022
Read also
- सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट; महामोर्चात भुजबळांचा हल्लाबोल
- “फडणवीसांनी राज्यपाल अन् आपल्या सहकाऱ्यांच्या बुद्धीची तपासणी करावी”, सेनेचा टोला
- “चंद्रकांत पाटलांनी घेतला शाई फेक प्रकरणाचा धसका, आता तोंडावर थेट फेसमास्क लावला”
- अन्, स्टेजवरच सुषमा अंधारेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचे घेतले आशीर्वाद, भाजपची टिका
- “राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो” ; अजित पवार