मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेण्यास एसटी कर्मचारी तयार नाहीयेत. याच दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.
भाजपने देखील त्यांच्या काळात ST कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला – राजू शेट्टी
परीवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे 10 मिनटे चर्चा झाली. या बैठकीत ST कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. या प्रकरणात समन्वयाने सुवर्णमध्य काढत संप कसा मिटवता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. ST कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन मंत्रालय आज तयार करत आहे.
ST कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा; भाजप नेते नितेश राणेंची मागणी
हा प्रस्ताव आजच तयार करून संपकरी कर्मचारी संघटनांना दिला जाणार आणि त्यावर समाधान कारक तोडगा काढला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेत संप मिटवण्यासाठी निर्णायक चर्चा झाल्याची माहीती मिळतेय.
Read Also :
- बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती – चंद्रकांत पाटील
- अमरावती शहर बंदला हिंसक वळण; जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड
- एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अमानवीय, महाविकास आघाडी सरकारच्या निर्दयतेचा कळस – चंद्रकांत पाटील
- सदाभाऊ आणि पडळकरांनी लोकांना वेठीस धरले, वेळ आल्यावर त्यांनाही बघू; अनिल परबांचा इशारा
- धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी: रक्तदान करून आंदोलन सुरूच