मुंबई : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात घुसल्यामुळे वाद पेटला आहे. सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावले आहे, त्यांनीच लोकांनाही ऐन दिवाळीत वेठीस धरले आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू, असा इशाराच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड भाजपाचा किल्ला अभेद्य; ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आजही तोडगा निघाला नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधून पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले आहे.
कंगना रनौतचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घ्या, गुन्हा दाखल करा; नवाब मलिकांचा हल्लाबोल
माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर येण्याची तयारी कर्मचारी दाखवत आहेत. त्यांना संरक्षणाची हमी दिली आहे. विलिनीकरण्याच्या मागणीबाबत त्यांनी समितीसमोर जावं. कामगारांनी कामावर जावे. राजकीय पक्ष पोळी भाजून बाहेर जातील पण नुकसान तुमचे होईल. हायकोर्टाने विचार करून 12 आठवड्यांचा कालावधी दिला आहे, तो आम्ही नाही दिला. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन परब यांनी केलं.
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही संप भडकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एसटी आणखी खड्ड्यात जाईल, असे वागू नका पगारवाढी संदर्भातील बोलणी सुरू होतील, तेव्हा पगार वाढवण्यासंदर्भात बोलावे, सदाभाऊ खोत आंदोलन भरकटवू नका. त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांनीही विचार करावा की त्यांचे यात नुकसान आहे, असंही परब म्हणाले.
Read Also :
- धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी: रक्तदान करून आंदोलन सुरूच
- ST कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा; भाजप नेते नितेश राणेंची मागणी
- भाजपने देखील त्यांच्या काळात ST कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला – राजू शेट्टी
- अनिल देशमुखांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला: अधिकाऱ्यांकडून छळवणूक केली का? देशमुख म्हणतात…
- राज्यात ‘बिगबॉस’चा शो, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली काय माहिती – पंकजा मुंडे