पिंपरी चिंचवड : कोरोनाकाळात गायब असलेले नेते, इच्छुक उमेदवार नगरसेवक होण्यासाठी आपापल्या प्रभागात सक्रिय झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशा आयत्या वेळी चमकोगिरी करणाऱ्या इच्छुकांना येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत जनता कितपत साथ देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एसटी आंदोलन चिघळले: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना अटक, मंत्रालयाजवळ पोलिसांचा फौजफाटा
शहरात महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. अद्याप प्रभाग रचना व आऱक्षण सोडत जाहीर झाली नसली तरीही इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात नागरिकांच्या मदतीला धावून जात होते. मात्र, कोरोना काळात त्यावेळी गायब असणारे स्वयंघोषित नगरसेवकांची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे ते लोकसेवेसाठी सक्रिय सहभाग घेत असल्याचे दिसत आहे.
आम्हाला गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; निलंबित एसटी कामगारांचा सरकारला इशारा
महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. आपल्याला यंदा तरी निवडणूक लढविण्यास संधी मिळेल, या आशेने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. निवडणूक रणधुमाळी अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी सोशल मिडियावर इच्छुकांचा प्रचार बरसण्यास सुरूवात झाली आहे. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. दिवाळीचे औचित्यसाधून स्थानिक नेत्याचे आपल्यावर लक्ष राहावे म्हणून इच्छुकांची चांगलीच गर्दी होणर असल्याची चर्चा रंगली आहे. तर या साऱ्या वातावरणामुळे सोशल मिडीयाही तापला आहे.
सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही; भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा निर्धार
इच्छुकांकडून कार्यकर्त्यांचे वाढदिवस, प्रत्यक्ष भेटीसाठी घेवून वैयक्तिक चर्चा करून मत आजमावले जात आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवारांनी कामाला सुरूवात केली आहे. कोरोना काळात नॉटरिचेबल असलेले नेते मात्र प्रभागातील कार्यकर्ते आपल्या रेंजमध्ये आणण्यासाठी शक्कल लढवित आहेत.
Read Also :
- एसटी संप चिघळणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम
- नियोजन समितीच्या निव़डणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी; भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित
- देवेंद्र फडणवीसांवर खोटारडे आरोपकरून नवाब मलिक स्वतःची कबर खणत आहेत – चंद्रकांत पाटील
- देशद्रोही ‘नवाब’ हीच तुमची लायकी; पुण्यात नवाब मलिकांचा पुतळा जाळून भाजपच्या वतीने निषेध
- किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? – प्रविण दरेकर