धुळे : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये एसटी कामगारांतर्फे आंदोलन सुरू आहे. एकीकडे राज्यशासन हे आंदोलन दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे धुळ्यातील एसटी कर्मचारी आंदोलकांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने राज्य शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. संपावर जाण्याआधी एसटी कर्मचारी नागरिकांना ज्या पद्धतीने सेवा देत होते, त्याच पद्धतीने संपावर गेल्यानंतर देखील रुग्णांना भासणार्या रक्ताचा पुरवठा आरोग्य विभागाला करून अनोख्या पद्धतीने नागरिकांची सेवा सुरूच ठेवण्याचा प्रयत्न या संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी राज्य शासनातर्फे निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. राज्य शासनातर्फे आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचारी संप मागे घेणार नाही असा पावित्रा या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
कंगना रनौतचा पद्मश्री पुरस्कार तात्काळ काढून घ्या, गुन्हा दाखल करा; नवाब मलिकांचा हल्लाबोल
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कामगारांना संप मागे घेण्याचं आणि कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मी पुन्हा आवाहन करतो की, त्यांनी कामावर जावं, नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष आपला वापर करेल, मात्र तुमचं नुकसान भरुन निघणारं नाही. सदाभाऊ खोत, पडळकर संप भडकावण्याचं काम करतायत, त्यांची जबाबदारी कोण घेणार नाहीत. ते हळूहळू संपापासून दूर जातील. कामगारांनी विवेकाने विचार करावा. कोरोनाच्या काळातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आणखी नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय.
Read Also :
- ST कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा; भाजप नेते नितेश राणेंची मागणी
- भाजपने देखील त्यांच्या काळात ST कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला – राजू शेट्टी
- अनिल देशमुखांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला: अधिकाऱ्यांकडून छळवणूक केली का? देशमुख म्हणतात…
- राज्यात ‘बिगबॉस’चा शो, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली काय माहिती – पंकजा मुंडे
- पिंपरी-चिंचवड भाजपाचा किल्ला अभेद्य; ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी