मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्टसंदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्याचा घोटाळा आणि कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचारी संप यामुद्यावर भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरचं ते प्रकरण बाहेर काढणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.
राष्ट्रवादीचा भाजपला दुहेरी दणका: परभणीत ६ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ, यवतमाळचा माजी आमदारही फोडला
वक्फ बोर्डच्या कार्यालयात छापे टाकण्याचं सांगण्यात आलं आहे. माझं ईडीच्या लोकांना आवाहन आहे की अफवा पसरवण्याचं काम बंद करावं. पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करुन भूमिका स्पष्ट करावी. सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवावी. काही बातम्या प्रसिद्ध करुन तुम्ही बदनामी करु शकत नाही. आपल्या वरिष्ठांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यातील एंडोवमेंट ट्रस्टनं बनावट कागदपत्र दाखवत एमआयडीसीत जमीन घेतली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. ईडीच्या एंन्ट्रीचं स्वागत आहे. वक्फ बोर्डात आम्ही क्लिनअप अभियान सुरु केलं, असं नवाब मलिक म्हणाले.
महाराष्ट्र हळहळला: सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या निधनाने खळबळ
क्लिन अप अंतर्गत मंदिर, मस्जिद आणि दर्गाहच्या जमीन हडपली आहेत ते बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं जमिनी हडप केल्या आहेत. ईश्वराच्या नावावर, अल्लाहच्या नावावर दिलेल्या जमिनी हडपण्यात आल्या. ती प्रकरणं बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं कसे शेकडो कोटी हडपले ते बाहेर काढणार आहे. जे अधिकारी या भ्रमात आहेत की नवाब मलिक घाबरू शकतात मी त्यांना सांगू शकतो की मी या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाणार आहे, असं मलिक म्हणाले.
Read Also :
- कंगनाने देशाचा अपमान केलाय, लाज लज्जा असेल तर तिने माफी मागावी – संजय राऊत
- संजय राऊत पिसाळलेलं पात्र, त्यांच्या मेंदूत 21 इंजेक्शन मारण्याची गरज – गोपीचंद पडळकर
- वरचा मजला रिकामा असलेल्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार रद्द करा – नीलम गोऱ्हे
- सार्वजनिकरित्या माफी मागून ते ट्विट ४८ तासांत डिलिट करा,अन्यथा…; अमृता फडणवीसांचा मलिकांना इशारा
- संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील