मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक खुलाश्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेचे वळण लागले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता. जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांनतर त्यांनी नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केला. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दिली होती.
Mr. @nawabmalikncp shared series of defamatory, misleading and maligning tweets including some pictures!
Here is Notice of Defamation including criminal proceedings under various Sections of IPC.
Either delete tweets in 48 hours with unconditional public apology or face action ! pic.twitter.com/nNPYQ7O9FK— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 11, 2021
देवेंद्र फडणवीसांसोबत जयदीप राणाचं खास कनेक्शन असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई नदी संरक्षणासाठी एक रिव्हर साँग तयार केलं होतं. सोनू निगम आणि अमृता यांनी ते गाणं गायलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांनीही अभियन केला होता, असे मलिक यांनी म्हटले होते. त्यावरुन आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असा इशार अमृता फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे.
Read Also :
- संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील
- महाराष्ट्र हळहळला: सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या निधनाने खळबळ
- राष्ट्रवादीचा भाजपला दुहेरी दणका: परभणीत ६ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ, यवतमाळचा माजी आमदारही फोडला
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; आज ३०० कामगार निलंबित केले जाणार?
- नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटलांची मागणी