मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण होत नाही आणि वेतन वाढ होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. राज्य शासनाकडून संप मागे घेण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. आता तिसऱ्या दिवशी सुद्धा संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एसटी संप चिघळणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जवळपास 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी 376 कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तर दुसऱ्या दिवशी 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं, मी सतत एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की संप मागे घ्या. कोर्टानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे कमिटी नेमलीय, कर्मचाऱ्यांची मागणी कमिटीपुढे जाऊन मांडावी लागेल. कमिटी जो अहवाल देईल तो सर्वांना लागू असेल. इन्क्रीमेंटची मागणी वगळता मझ्या अखत्यारितील मागण्या मान्य झाल्या आहेत. कोर्टानं संप बेकायदेशिर ठरवलाय, संप मागे घ्या.
काल सदाभाऊ खोतांना मी समजावून सांगितलं, चर्चा झाली पण त्यांनी बाहेर जाऊन भलतंच सांगितलं. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी बोलायला मी केव्हाही तयार आहे. संप सुरुच राहीला, तर एसटीचं मोठं नुकसान होईल. कामगार राजकीय बळी ठरले तर ते दूर्देवी. विलीनीकरणाची मागणी ताबडतोब 2-4 दिवसांत पूर्ण होणार नाही, वेळ लागेल. नेत्यांनी कर्मचाऱ्यांना असेच भडकवले तर नुकसान कर्मचाऱ्यांचेच आहे. विलीनीकरणासंदर्भात आधीच कमिटी नेमलेली आहे, जीआर काढलाय, ही वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं.
Read Also :
- नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटलांची मागणी
- राजकारणाला बळी पडू नका, संप मागे घ्या, सगळ्यांचेच नुकसान होत आहे – अनिल परब
- एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असं सुधीर मुनगंटीवारांनीच सांगितलयं – संजय राऊत
- कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका, मी स्वत: यामध्ये लक्ष घालीन – राज ठाकरेंच आश्वासन
- देवेंद्र फडणवीस लेखी माफी मागा; नवाब मलिकांच्या लेकीने पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस