मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे भाजपवर सातत्याने टीका करतायत. आरोप-प्रत्योरोपांच्या या वादात आता फडणवीस आणि मलिकांच्या कुटुंबीयांनीही उडी घेतली आहे. नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हे आरोप फेटाळून लावत नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक-खान यांनी देवेंद्र फडणवीसांना आता कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फडणवीसांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस काढली आहे.
किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? – प्रविण दरेकर
एनसीबीने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. समीर खान यांच्या घरात ड्रग्स आढळून आले असे आरोप फडणवीसांनी केले होते. हे आरोप नवाब मलिकांसह त्यांच्या कुटुंबियांनीही फेटाळून लावले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप करतायत. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना चक्क ड्रग्स माफियांचे मास्टरमाईंट म्हटले होते. त्यामुळे फडणवीसांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मलिकांवर सातत्याने टीका केली आहे.
False accusations ruin lives. Before one accuses or condemns they must know what they are talking about. This defamation notice is for the false claims & statements which Mr. @Dev_Fadnavis has put on my family. We will not back down. pic.twitter.com/xsQYcgDhMb
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 11, 2021
एकुणच आर्यन खान ड्रग्स प्रकरणापासून सुरु झालेलं हे राजकारण आता फडणवीस विरुद्ध मलिक असं झालंय. यात दोन्ही नेत्यांचे कुटुंबियही ओढले गेले आहेत. अमृता फडणवीस अनेकदा ट्विटरवरुन राजकीय वक्तव्य करत होत्या. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिकांच्या दोन्ही कन्या निलोफर मलिक-खान आणि सना मलिक-शेख हे देखील आता राजकीय वक्तव्य करु लागले आहेत. निलोफर मलिक यांना थेट कायदेशी नोटीस पाठवल्याने मलिक-फडणवीस वाद आणखी चिघळला जाण्याची शक्यता आहे.
Read Also :
- कोरोनाकाळात गायब असलेले नेते आता मात्र सक्रीय; निवडणुकांची चाहूल लागताच इच्छुकांच्या सोशल मीडियावर घिरट्या
- एसटी संप चिघळणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम
- नियोजन समितीच्या निव़डणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी; भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित
- देवेंद्र फडणवीसांवर खोटारडे आरोपकरून नवाब मलिक स्वतःची कबर खणत आहेत – चंद्रकांत पाटील
- देशद्रोही ‘नवाब’ हीच तुमची लायकी; पुण्यात नवाब मलिकांचा पुतळा जाळून भाजपच्या वतीने निषेध