सांगली : सांगलीत एसटीच्या संपकरी वाहकाचे हृदयविकाराने निधन झाले आहे. आर.एन. पाटील असे या वाहकाचे नाव असून एसटी संपाच्या विवंचनेतून ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत पाटील यांच्या मृतदेहावर कवलापूर या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासनाने एसटी कर्मचारी आर.एन.पाटील यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी पुढे येत आहे. मृत आर.एन.पाटील हे 17 वर्षांपासून एसटी सेवेत वाहक म्हणून काम करत होते. एसटीच्या संपाच्या पहिल्या दिवशी ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर ते गेली तीन दिवस आंदोलनाकडे आले नाहीत.
देवेंद्र फडणवीस लेखी माफी मागा; नवाब मलिकांच्या लेकीने पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस
या दरम्यान ते एसटीच्या संपाबाबत सर्व कर्मचारी यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. तर आपल्या नोकरी बाबत ते सतत सर्वांशी बोलत चर्चा करत असायचे. एसटीचा संप लांबत चालल्याने पाटील हे तणावात होते. आज सकाळी ते घरीच असताना त्यांना चक्कर आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हीलला दाखल केले. मात्र त्याठिकाणी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगली सिव्हीलला धाव घेतली.
कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका, मी स्वत: यामध्ये लक्ष घालीन – राज ठाकरेंच आश्वासन
तसेच मृत वाहक आर.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मृत पाटील हे एसटी संपाच्या तणावाखाली होते. यातूनच त्यांना त्रास झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. एसटीचा संप वाढत चालल्याने एसटी कर्मचारी तणावाखाली असल्याने आशा घटना यापुढे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने संपावर तोडगा काढावा आणि मृत वाहकाच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी भाजपा नेते पृथ्वीराज पवार यांनी केली आहे.
Read Also :
- राष्ट्रवादीचा भाजपला दुहेरी दणका: परभणीत ६ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ, यवतमाळचा माजी आमदारही फोडला
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; आज ३०० कामगार निलंबित केले जाणार?
- नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटलांची मागणी
- राजकारणाला बळी पडू नका, संप मागे घ्या, सगळ्यांचेच नुकसान होत आहे – अनिल परब
- एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असं सुधीर मुनगंटीवारांनीच सांगितलयं – संजय राऊत