मुंबई : मागील दोन वर्षापासून संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शनची गरज असते, त्यामुळे संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज आहे, तरचं हे ठिकाणवर येतील, असं वक्तव्य भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना केले आहे.
देवेंद्र फडणवीसांवर खोटारडे आरोपकरून नवाब मलिक स्वतःची कबर खणत आहेत – चंद्रकांत पाटील
पडळकर म्हणाले, दीड दमडीच्या पगारावर आपण किती बोलावं? महाराष्ट्राला किती उपदेश करावेत? संजय राऊत देत असलेले उपदेश महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे. शिवसेनेनं एक बैठक घेऊन यांना रेबीज इंजेक्शनची एक लस द्यावी, असेही पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकारांच्या यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत कसं प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांची हीच ड्युटी आहे, त्यांना याच कामासाठी ठेवलेला आहे. हे कोणत्या आंदोलन कधी गेले ? पगार पुरतं संजय राऊतांना बोलावं लागतं, असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.
नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटलांची मागणी
एसटी आंदोलनावरही पडळकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे त्यावेळी अर्थमंत्री होते परिवहन विभागाकडून जर एखादा प्रस्ताव आला असता तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करू शकलो असतो. पण तसा प्रस्ताव आला नव्हता.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; आज ३०० कामगार निलंबित केले जाणार?
एसटी महामंडळं सरकारमध्ये विलिनीकरणं चुकीचं आहे असं भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले. हे तात्काळ शक्य नाही. भाजपमधील काही हवशे, नवशे, गवशे हे यावर नाचत आहेत. त्यांच्या नाचण्यानं कामगारांचे प्रश्न सुटतील तर सुटतील, असं शिवसेना खासदार राऊत म्हणाले होते. कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. एसटी कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये. कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, असंही राऊत म्हणाले होते.
Read Also :
- वरचा मजला रिकामा असलेल्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार रद्द करा – नीलम गोऱ्हे
- सार्वजनिकरित्या माफी मागून ते ट्विट ४८ तासांत डिलिट करा,अन्यथा…; अमृता फडणवीसांचा मलिकांना इशारा
- संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील
- महाराष्ट्र हळहळला: सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या निधनाने खळबळ
- राष्ट्रवादीचा भाजपला दुहेरी दणका: परभणीत ६ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ, यवतमाळचा माजी आमदारही फोडला