पुणे : मागील काही दिवसात झालेल्या राजकीय परिस्थितीनंतर अजित पवारांनी या वयामध्ये पवार साहेबांना सोडायला नको होतं. असं म्हटलं जातंय. साहेब जे म्हणतील ती पुर्व दिशा असं म्हणून आम्ही परंतु १९८७ पासून साहेबांना दैवत मानून त्यांचं काम करत आलो आहे. परंतु साहेबांनी २०१४, २०१७ २०१९ या दरम्यान भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मध्यंतरी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन घेण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला. मग ज्याला आपण मानतो, ज्यांच्याकडे बघून राजकारणात आलोय. तेच भूमिका बदलत असतील तर आपल्यासमोर पर्याय काय ? असा सवाल करत अजित पवारांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी दौंड येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“मोदींनी किती मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली”, ? राऊतांचा भाजपचा खोचक सवाल
आपण देशपातळीवर नजर टाकली तर १३५ जनतेसमोर देशाला कणखर भूमिका घेण्याची क्षमता फक्त नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दिसत आहे. त्यांच्याकडे आता संपुर्ण जग विकासपुरूष म्हणून पाहत आहे. मागील दहा वर्षात नरेंद्र मोदींनी भारताचा नावलौकिक वाढवण्याच्या ककरता खुप मोठ परिश्रम घेतले आहेत. आता साहेब त्यांनीच सांगितलं होतं की साहेबांच्या हाताला बोटाला धरून राजकारणात आलो आहे. मग त्यांच्यासोबत जाण्याची हरकत काय ? असा सवाल करत ते आज चांगलं काम करत आहेत. मग त्यांच्यासोबत जाऊया. राष्ट्रवादीची वैचारीक भूमिका वेगळी ठेूऊन आपण काम करूया. असेही त्यांना सांगितलं होतं.
हेही वाचा…“नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही”, दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
पुढे बोलतांना राष्ट्रीय पातळीवर अनेकांनी आपल्या पक्षाची वैचारिक भूमिका बाजूला ठेऊन भाजपसोबत काम केलं आहे. यामध्ये मग ममता बॅनर्जी असतील. फारूक अब्दुला असतील. चंद्रबाबू नायडू असतील, बिहारचे नितीश कुमार असतील असे अनेक नेत्यांच्या नावे यामध्ये आपल्याला सांगता येतील. असेही अजित पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“बारामती जिंकून आणा, भाजपचाच दादांना आदेश”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांची भेट, अन् विनोद पाटलांची संभाजीनगरमधून माघार, काय घडतंय ?
हेही वाचा..म्हणून आज अमरावतीकरांना बळवंत भाऊंची गरज “, यशोमती ठाकुरांनी विरोधकांवर डागलं टिकास्त्र
हेही वाचा…“जिल्ह्याला लागलेली दृष्ट कशी दुर करायची ते माहितीय”, विश्वजीत कदमांनी दिला कडक इशारा