वॉशिंग्टन : देशात सुरू असलेल्या कृषी कायद्याच्या विरोधातील पडसाद आता परदेशात देखील पाहण्यास मिळत आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथे भारतातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शीख समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले आहे.
कृषी कायद्याचा विरोध करत आंदोलन करणाऱ्यांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर स्प्रे मारण्यात आला व यावेळी खलिस्तानी झेडें देखील फडकवण्यात आले. आंदोलन कर्त्यांकडून महात्मा गांधींचा पुतळा खलिस्तानच्या झेंड्याने झाकण्यात आला.
#WATCH | Washington DC: Khalistan flag draped over Mahatma Gandhi statue near the Indian embassy. Protesters were demonstrating against the Farm bills. pic.twitter.com/8G9ngHyAeZ
— ANI (@ANI) December 12, 2020
या घटनेनंतर भारतीय दूतावासानं मेट्रोपॉलिटन आणि नॅशनल पार्क पोलिसांत तक्रार नोंदवली. या प्रकाराची माहिती परराष्ट्र विभागाला देण्यात आली.
दरम्यान, याआधी देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लंडनमध्ये देखील निदर्शन करण्यात आली होती. यावेळी देखील आंदोलनात खलिस्तानी झेंडे फडकले होते. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे लोण आता हळूहळू इतरत्र पसरत असल्याचे दिसत आहे.