मुंबई : कोरोनाच्या महामारीत देशाच्या जनतेचे काँग्रेसने रक्षण केले. देशातील कित्येक लोकांना आधार देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. यामुळे राज्यासह देशातील जनता मोदींच्या सरकारला चांगलीच जागा दाखवणार आहे. याविरोधात राज्यात आम्ही जोरदार आंदोलन करणार आहे, अशी माहिती आज (दि.०८) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत
पटोले म्हणाले की, मोदींनी महाराष्ट्राचा आणि जनतेचा अपमान केला आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत होते. त्यावेळी मोदींना कोरोना दिसला नाही का? मोदीजींनी सध्या खोट बोलयचे पण रेटून बोलायचे असा ठेका धरला आहे. राज्यातील भाजप कार्यालयासमोर उद्यापासून आम्ही आंदोलन करणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
ठाण्यातील बॅनरबाजीमुळे सेनेच्या गोटात खळबळ; एकनाथ शिंदेनी दिला तात्काळ ‘हा’ आदेश
“कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मर्यादेचा कळस गाठला होता. राजकारण केलं. काँग्रेसने महाराष्ट्रातून मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं. महाराष्ट्रातून कामगारांना रेल्वेचं तिकीट काढून पाठवून दिलं. काँग्रेस अफवा परवून अडचणी आणखी वाढविल्या. त्यामुळे कोरोना परसविण्यास काँग्रेस जबाबदार आहे”, असा थेट हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.
मोदींनी महाराष्ट्रातील मतदारांना कोविड सुपर स्प्रेडर म्हणणं हे धक्कादायक – सुप्रिया सुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत होते. मोदी म्हणाले की, “कोरोना काळात शेतकऱ्यांवर अडचणी येणार नाहीत, याची आम्ही खबरदारी घेतली. आम्ही शेकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिलो. त्यांना सहकार्य केलं. गतिशक्ती योजनेवर काम सुरू आहे.पाच वर्षांत पायाभूत सुविधांमुळे सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक क्षेत्रात उत्पन्न वाढतं आहे. छोट्या उद्योगांसाठी ३ लाखांची मदत करण्यात आली”, असंही त्यांनी संसदेत सांगितलं.
Read also:
- शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
- शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
- राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने; अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा कडाडून विरोध
- शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी राहूद्या, राजकारणासाठी त्याचा बळी नको – मनसे
- म्हापश्यातील मोदींची सभा ठरणार ‘गेमचेंजर’; भाजपला मिळणार बुस्टर