मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कमध्येच त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या भाजपला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी चांगलेच फटकारले. या मागणीला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला पाहिजे, त्याची स्मशानभूमी होऊ नये. शेजारी दुसरी चांगली मोठी स्मशानभूमी आहे. परंतु शिवाजी पार्क हे एकमेव मोठं ग्राऊंड आहे. ज्यावर मुलांना खेळता येतं. तिथं शाळा, कॉलेज किंवा इतर मुलांच्या मॅचेस होतात. व्यक्तींचं स्मारक करायचे असेल तर इतर अनेक जागा आहेत, परंतु मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानांवर अतिक्रमण करावं असे मला वाटत नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पुन्हा भिर्रर्र… आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव आढळरावांनी केले बैलगाडा शर्यतीचे आयोजन
भाजपचे आमदार राम कदम यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात राम कदम यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. भारतरत्न लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कोट्यवधी चाहते, संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या हितचिंतकांच्या वतीने माझी विनंती आहे की, लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात यावं, ज्या ठिकाणी त्या पंचतत्वात विलीन झाल्या, असं राम कदम यांनी पत्रात नमूद केले होते. या मागणीचा विचार करून तात्काळ स्मारक उभारायला हवे. कारण हे स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असेही त्यांनी म्हटले होते.
बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत
सध्याच्या घडीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणाऱ्या लता मंगेशकर या दुसऱ्या व्यक्ती आहेत. शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे भाजप आमदार राम कदम यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते.. काही लोकांनी लतादीदींच्या स्मारकाची मागणी केली आहे. पण त्यांना मागणी करण्याची गरज नाही. लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण करु नका, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला होता.
Read also:
- राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने; अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा कडाडून विरोध
- शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी राहूद्या, राजकारणासाठी त्याचा बळी नको – मनसे
- म्हापश्यातील मोदींची सभा ठरणार ‘गेमचेंजर’; भाजपला मिळणार बुस्टर
- मोदींनी महाराष्ट्रातील मतदारांना कोविड सुपर स्प्रेडर म्हणणं हे धक्कादायक – सुप्रिया सुळे
- ठाण्यातील बॅनरबाजीमुळे सेनेच्या गोटात खळबळ; एकनाथ शिंदेनी दिला तात्काळ ‘हा’ आदेश