बीड : बीडमध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. आज बीडमध्ये शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकास कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
नितेश राणेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी
स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आम्ही आणलेल्या कामावर डल्ला मारत आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष कामं म्हणून या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र स्थानिक आमदार हे काम करताना आडकाठी आणत आहेत असं म्हणत शिवसैनिक आज बीडमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच प्रचंड घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून या विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याचा निषेध नोंदवला आहे. यानंतरही या कार्यक्रमात शिवसैनिक गनिमीकावा पद्धतीने निषेध नोंदवणार आहेत. तसेच कार्यक्रमात गोंधळ घालणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री; ठाण्यातील कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, अजित दादा तुमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आघाडीचा धर्म शिकवा असं म्हणत बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आलीय. यावेळी काळे झेंडे घेऊन हे शिवसैनिक रस्त्यावर आले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी विकास कामाच्या उद्घाटनावरून आमने-सामने आली आहे.
पुन्हा भिर्रर्र… आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव आढळरावांनी केले बैलगाडा शर्यतीचे आयोजन
बीड शहरातील शंभर कोटी पेक्षा जास्त विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रम होत आहे. स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर हे शिवसैनिकांना काम करू देत नाहीत. शिवसैनिकांनी आणलेल्या कामाचे उद्घाटन परस्पर आमदार करत आहेत असा आरोप शिवसैनिकांनी केलाय.
Read also:
- शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी राहूद्या, राजकारणासाठी त्याचा बळी नको – मनसे
- म्हापश्यातील मोदींची सभा ठरणार ‘गेमचेंजर’; भाजपला मिळणार बुस्टर
- मोदींनी महाराष्ट्रातील मतदारांना कोविड सुपर स्प्रेडर म्हणणं हे धक्कादायक – सुप्रिया सुळे
- ठाण्यातील बॅनरबाजीमुळे सेनेच्या गोटात खळबळ; एकनाथ शिंदेनी दिला तात्काळ ‘हा’ आदेश
- बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत