मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे. दरम्यान, आर्यन खान प्रकरणाला राजकीय रंगातील आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी थंडावणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांची धमकी
आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
Aryan Khan walks out of Mumbai's Arthur Road Jail few weeks after being arrested in drugs-on-cruise case pic.twitter.com/tdYosUZ2nP
— ANI (@ANI) October 30, 2021
आर्यन खानला अटक होताच नवाब मलिकांकडून पत्रकार परिषद घेऊन कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कारवाई बनावट असल्याचा दावा, मनीष गोसावीवर प्रश्नचिन्ह, त्यानंतर एनसीबीनं पत्रकार परिषद घेत गोसावी आणि भानुशाली साक्षीदार असल्याचं सांगितलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपनेही या प्रकऱणात उडी मारली होती. यावरून आर्यन खान प्रकरणाला नाट्यमय वळण लागले होते. आज आर्यन खानला २७ दिवसांनंतर जामीन मंजून झाला असून तो बाहेर आला आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाला लागलेल्या राजकीय रंगातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी खंडावणार का?, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो; नवाब मलिकांचा पटलवार
- अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; दोन्ही सभापतीपदांवर महाविकास आघाडीचा विजय; भाजपचीही साथ
- गुन्हेगारीवरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक; गुंडगिरीत सहभागाचा महापौरांचा आरोप
- एसटी चालकाची आत्महत्या; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा
- मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे खळबळजन वक्तव्य