पुणे : भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षातील गुन्हेगारीबद्दल आरोपप्रत्यारोप करत असताना आज या वादात भर पडली. महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारीचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकावर वानवडी येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी महापौरांनी गुन्हेगाराला फोन करायला लावल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. यास प्रत्युत्तर देताना महापौरांनी जगताप यांनी बेजबाबदार वैयक्तीक टीका थांबवा, अन्यथा यापुढे तुमचीही प्रकरणे बाहेर काढू, त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला.
क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? – संजय राऊत
सभागृहनेते गणेश बीडकर यांनी गुरुवारी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ‘भाजपचा गुन्हेगारीचा दुसरा अंक’ असे सांगत प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये भाजपवर गंभीर आरोप केल्याने हा वाद वैयक्तीक पातळीवर आल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे, त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद तीव्र झाला आहे.
मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? – छगन भुजबळ
‘‘दत्तवाडी पोलिस ठाण्यात सदा ढावरेवर दाखवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचे धागेदोरे थेट महापौरांपर्यंत येत आहेत. या पदाचा मान राखण्यासाठी गुन्हा दाखल होऊ नये असे वाटते. पण सदा ढावरेला कोणाकोणाचे फोन येत होते याचा सीडीआर काढावा, भाजपचे पदाधिकारी गुंडगिरी करायला लावून संघटित गुन्हेगारीत सहभागी आहेत’’, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
गृहमंत्री तुमचाच आहे, ”करा न काय करायचयं ते”; भाजप आमदाराचं नवाब मलिकांना चॅलेंज
‘‘प्रशांत जगताप यांना रोज आमच्या पक्षाच्या नेत्यांवर काहीतरी बोलायची सवय लागली आहे. त्यांनी स्वतःला सावरायला हवे. कोणत्याही प्रकरणात नाव घेताना त्याची सत्यता असावी, पुरावे असले पाहिजे. यापुढे त्यांचे चुकीचे बोलणे खपवून घेतले जाणार नाही. असेच वैयक्तीक आरोप करणार असाल तर याची किंमत मोजावी लागेल’’, असे महापौर मुरली मोहोळ यांनी म्हटले आहे. आमच्यावर झालेल्या आरोपांवर तपास यंत्रणा काम करतील, त्यास आम्ही तयार आहोत. भ्रष्टाचार केल्यानेच त्यांच्याच पक्षाच्या विरोधीपक्षनेत्यांचे पती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना लाच घेतल्याने जेलमध्ये गेले होते’’, असे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.
Read Also :
- एसटी चालकाची आत्महत्या; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा
- मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे खळबळजन वक्तव्य
- माजी गृहमंत्री अनिल देखमुखांना मोठा झटका; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
- गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांची धमकी
- मोर्चा कसा काढतात याची भाजपने प्रॅक्टीस करावी; गुलाबराव पाटलांचा टोला