पुणे : भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केलीय. नवाब मलिक कौटुंबिक कारणामुळं चुकीचे आरोप करत आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केलाय. मलिक यांनी वैयक्तिक कारणासांठी महाराष्ट्राला वेठीस धरु नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडं गृह खातं असून त्यांनी भाजपचं पितळ उघडं पाडण्याचं वक्तव्य करण्याऐवजी काय करायचे ते करावं, असं आव्हान चंद्रशेकर बावनकुळे यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादीला आव्हान दिलंय.
आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक
भाजपाचे पितळ उघडं पाडण्याची भाषा करणा-यांचे सरकार दोन वर्षापासुन राज्यात आहे ” करा ना काय करायचे ते ” तुमच्या हातात तपास यंत्रणा आहे गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे वाट कशाची पहाता असा सवाल बावनकुळे यांनी नबाब मलिकांना आव्हान दिलंय.
बहुजन विकास आघाडीला धक्का; 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्षही गळाला
नबाब मलिकांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाल्याच्या रागातून ते चुकीची माहिती पसरवत आहेत. नवीन पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून काढण्याचे सोडून कारवाई करणा-या आधिका-यांना वैयक्तिक पातळीवर टार्गेट केलं जातंय, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. राज्य सरकारचा दुरपयोग केला जातोय. नबाब मलिकांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाल्याने मलिक फस्टट्रेशनमध्ये जाऊन बोलत असल्याचा गंभीर आरोप माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
Read Also :
- मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? – छगन भुजबळ
- क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? – संजय राऊत
- काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादी नेत्यांचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची फटाकेबाजी
- राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला
- कोण हा शाहरुख खान आणि त्याचा मुलगा? चंद्रकांत पाटलांचा सवाल