नागपूर : गोवा ड्रग्स क्रुझ पार्टी प्रकरण सुरू झाल्यापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. आजही मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला होता. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर दिलं आहे.
क्रांती रेडकर यांनी जपून बोलावं, इतिहास बाहेर काढला तर…; जितेंद्र आव्हाड यांच सूचक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असं फडणवीस म्हणाले. याशिवाय, नवाब मलिक दिवसभर काही ना काही बोलत असतात. सध्या त्यांना दुसरं काहीच काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं म्हणत या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं.
भाजपला पुन्हा एक धक्का; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्यासह भाजपवरही टीका केलीये. 7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील, माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आता मी काही बोलणार नाही, मला विषयांतर करायचे नाही. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार, असं नवाब मलिक म्हणाले होते.
Read Also :
- कोण हा शाहरुख खान आणि त्याचा मुलगा? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- बहुजन विकास आघाडीला धक्का; 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्षही गळाला
- आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक
- लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या – भाजप
- पेट्रोल डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला