वसई : वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला शिवसेनेनं मोठा दणका दिला आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झालाय. या पक्षप्रवेशामुळं वसई विरारमध्ये शिवेसनेची ताकद वाढली आहे.
अजित पवारांना पुन्हा धक्का; मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी
बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवक सुरेश चौधरी , नगरसेवक किशोर पाटील आणि नगरसेविका पुतूल झा आणि अकरा प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी या पक्ष प्रवेशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण!
पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण या पक्ष प्रवेशामुळं जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळेल असं म्हटलं आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील 14 जणांनी पक्षात प्रवेश केलाय. शिवसेना पालघर जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष आहे, त्याला आणखी बळकटी मिळेल, असं वसंत चव्हाण म्हणाले. तलासरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षांसहित संपूर्ण तालुका कार्यकारणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश झाला.यावेळी संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक हे उपस्थित होते.
Read Also :
- आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक
- लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या – भाजप
- पेट्रोल डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
- भाजपला पुन्हा एक धक्का; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
- क्रांती रेडकर यांनी जपून बोलावं, इतिहास बाहेर काढला तर…; जितेंद्र आव्हाड यांच सूचक वक्तव्य