मुंबई : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात पाटील यांनी स्व:ता ट्विट करून माहिती दिली आहे. करोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यावर त्यांनी करोना चाचणी करून घेतली त्यामध्ये त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार घेत आहेत.
जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्यांचे दात घशात गेले; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला
वळसे पाटील यांनी अलिकडेच नागपूर व अमरावतीचा दौरा केला आहे. त्यामुळे त्यांनी या दौऱ्यादरम्यान संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
विलासराव देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढणार – किरीट सोमय्या
वळसे पाडील यांनी आपल्या ट्वीटरवरून माहिती देताना सांगितले की, करोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे. नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास करोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.
Read Also :
- अजित पवारांना पुन्हा धक्का; मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी
- पुण्यातील भाजप नगरसेवकासह चार जणांवर गुन्हा दाखल; ‘त्या’ प्रकरणाने उडाली खळबळ
- पुण्यातील नगरसेवकांची संख्या आता १७५ होणार; पिंपरी चिंचवडला ११ नगरसेवक वाढणार
- देवेंद्र फडणवीस इकडे येऊन गाजर वाटप करुन गेले असतील – आदित्य ठाकरेंचा निशाणा
- जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…