दादर : शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढाईमुळे दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रंगतदार होताना दिसत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सिल्वासा येथे कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही; संभाजीराजेंचा सरकारला इशारा
कालच याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली होती. हाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, काल इथे महाराष्ट्रातून कोणी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. ते महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी इथे एवढे कोटी दिले, तितके कोटी दिले, असे सांगत फिरत असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून आदित्य ठाकरे यांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजपला धक्यावर धक्के; उल्हासनगरमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आम्ही इथे पक्ष वाढवण्यासाठी नाही आलो, आम्ही गोव्यात गेलो राजस्थानमध्ये गेलो परंतु ही लढाई न्याय हक्कासाठी आहे. डेलकर कुटुंब असेल, दादरा, नगर-हवेली असेल यांच्यासाठी आहे. दोन परिवार एकत्र आल्यानंतर जो उत्साह आहे तो मी पाहिला. डेलकर कुटुंबाचे मी इथे काम पाहिले, योगदान पाहिले. आजचा जनतेचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
बदला हा शब्द की योग्य ते मला माहित नाही पण न्याय हक्कासाठी ही लढाई सुरू आहे. मो कलाबेन आणि अभिनव यांच्याशी बोलत होतो त्यांचीही भावना हीच आहे इथे जनतेवर हुकूमशाही सुरू आहे, ती मोडून काढली पाहिजे. शिवसेना नेहमीच हुकूमशाही अन्यायाविरुद्ध लढली आहे. लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी उतरल्याचे आदित्य यांनी सांगितले.
Read Also :
- जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- विलासराव देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढणार – किरीट सोमय्या
- जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्यांचे दात घशात गेले; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला
- …तर एकनाथ खडसे यांना ईडी वाजत गाजत परत पाठवेल; गिरीश महाजनांचा टिमटा
- देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही – संजय राऊत