पुणे : अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीने छापा टाकला आहे. जगदीश कदम हे पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर जलसंपदा खात्यांमधील काही कंत्राटांचाही त्यांच्याशी संबंध आहे. पुण्यातील सिंध कॉलनीतील घरी ईडीने छापा टाकून कारवाई सुरु केली आहे.
…तर एकनाथ खडसे यांना ईडी वाजत गाजत परत पाठवेल; गिरीश महाजनांचा टिमटा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर आयकर विभागाने ७ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता छापे मारी केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी दौंड सहकारी हा दौंड तालुक्यातील आलेगावमधील साखर कारखाना विकत घेत त्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम कारखान्याचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मुंबईतील बडे प्रस्थ असलेले विवेक जाधव हे या कारखान्याचे संचालक आहेत.
जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्यांचे दात घशात गेले; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला
दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
Read Also :
- पुण्यातील भाजप नगरसेवकासह चार जणांवर गुन्हा दाखल; ‘त्या’ प्रकरणाने उडाली खळबळ
- पुण्यातील नगरसेवकांची संख्या आता १७५ होणार; पिंपरी चिंचवडला ११ नगरसेवक वाढणार
- देवेंद्र फडणवीस इकडे येऊन गाजर वाटप करुन गेले असतील – आदित्य ठाकरेंचा निशाणा
- जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- विलासराव देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढणार – किरीट सोमय्या