मुंबई : क्रांती रेडकर ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या आऱोपांबाबत बोलते आहे. नवाब मलिक गुंडागर्दी करून माझ्या नवऱ्याला खुर्चीवरून खाली खेचू पाहात आहेत असाही आरोप क्रांती रेडकरने केला आहे. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
पेट्रोल डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
‘एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कुणी टीका टीपण्णी केलीय असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का? क्रांती रेडकर विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तिच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे. शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही.’
प्रश्न मराठी अमराठी असण्याचा नाही, सत्य असत्याचा आहे. क्रांतीवर अन्याय होणार नाही. पण केंद्राच्या यंत्रणा राज्यात ज्या प्रकारे मागे लागल्यात व त्यानंतर आता ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामुळे सगळ्यांना घाम फुटायला लागला आहे. दिल्लीतून तपास यंत्रणांचं आक्रमण सुरू आहे. कारण नसताना मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होतोय. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहेत. निवडणुकीच्या तोंडवर देगलूरला धाडी पडल्यात. अशोक चव्हाण, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथं मराठी तर सगळेच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादी नेत्यांचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची फटाकेबाजी
- राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला
- कोण हा शाहरुख खान आणि त्याचा मुलगा? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- बहुजन विकास आघाडीला धक्का; 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्षही गळाला
- आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक