जळगाव : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असला तरी माघारीपर्यंत युतीविषयी चर्चा होऊ शकते असे संकेत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसवगळता इतर पक्षांची युती होते का? या विषयीची उत्सुकता त्यांनी कायम ठेवली आहे. रविवारी काँग्रेसवगळता इतर पक्षांची बैठक होणार होती मात्र सायंकाळी भाजपा कोअर कमिटीची गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात आयोजित केलेल्या सुरुवातीच्या दोन बैठकींना हजेरी लावली. नंतर मात्र भाजपा जातीयवादी पक्ष असल्याचं सांगत वेगळी भूमिका घेतला. हा प्रकार म्हणजे काँग्रेसचे सोयीचे राजकारण होते अशी टीकाही महाजन यांनी केली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. असे असताना आम्हाला गाफील ठेवून इतर पक्षांची खलबते सुरु होती असा आरोप करत गिरीश महाजन यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषगांने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात आग्रही भूमिका घेतली. सर्वपक्षीय पॅनेलसाठी दोन-तीन बैठका सकारात्मक झाल्या. जागावाटपाचे सूत्र ठरले, त्यानंतर त्या त्या पक्षांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळावला. मात्र आता आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या सूचना असल्याचं सांगितले. शेवटच्या क्षणी असे करणे चुकीचे होते असे करायचे होते तर आम्हाला सुरुवातीलाच सांगायला हवे होते असं सांगत गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
Read Also :
- पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या दोन्ही आमदारांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मैदानात!
- तीन हजार रोख, मटण-मासे पार्टी, पत्ते खेळायला पैसै! शिवसेना आमदाराने उलगडलं निवडणुकीचं गणित
- गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
- भाजपला पडली मोठी खिंडार; येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला; भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा रोख कुणाकडे?