पिंपरी चिंचवड : भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहरातील दोन्ही आमदारांनी (चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे) शहराची वाटणी केली आहे, अशी टीका शनिवारी (ता.१६) शरद पवार यांनी नाव न घेता केली होती. त्यावर दोन्ही आमदारांनी शरद पवारांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे. गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त विकास आम्ही गेल्या साडेचार वर्षात केला आहे, असे आमदार लांडगेनी सांगितले. तर, आमदार जगताप यांनी पवारांची टीकेची बातमी वाचून उत्तर देईन, असे सांगितले.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात अशा घटना घडतील की, आश्चर्य वाटेल – प्रकाश आंबेडकर
पवारसाहेब हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, असेही लांडगे म्हणाले. मात्र, शहराच्या विकासावर कुणाला शंका असेल, त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीच्या नेतृत्वात माजी आमदार विलास लांडेंना अखेर डच्चू?
पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना पवार यांनी भाजप, त्यांचे केंद्रातील सरकार, राज्यातील नेते तसेच पंकजा मुंडे आणि शहरातील दोन्ही आमदारांवर शनिवारी हल्लाबोल केला होता. राज्य सरकार पडणार या भुमिकेतून बाहेर पडा,असाा घरचा आहेर मुंडे यांनी दसरा मेळाव्यात दिला होता. त्याबाबत विचारणा केली असता त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत,असे सांगून त्या प्रश्नाला पवार यांनी बगल दिली होती. दरम्यान, मुंडे यांनी आपल्यावरील पवारांच्या टीकेवर लगेचच मुंबईत पलटवार केला. शरद पवार माझ्यापेक्षा मोठे आहेतच. यात वाद नाही.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात अशा घटना घडतील की, आश्चर्य वाटेल – प्रकाश आंबेडकर
पण, त्यांच्या बोलण्याने मी लहान होत नाही वा मोठीही होणार नाही,असा टोला मुंडे यांनी लगेच लगावला होता. तशीच काहीशी प्रतिक्रिया आ. लांडगे यांनीही त्यांच्यावर पवारांनी केलेल्या टीकेवर दिली. शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, असे आ. लांडगे म्हणाले. भाजपच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघे शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत. माननीय शरद पवारसाहेबांच्या टीकेला उत्तर देण्य़ाइतका मी मोठा नाही. पण, भाजपच्या कार्यकाळाआधी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा जेवढा विकास झाला नाही, तेवढा आम्ही दोघांनी मिळून गेल्या साडेचार वर्षात करून दाखवला आहे. त्याबाबत कोणाच्या मनात शंका असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी, त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत,असेही ते म्हणाले.
Read Also :
- भाजपला पडली मोठी खिंडार; येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला; भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा रोख कुणाकडे?
- सत्ता कोणाचीही असो, अंगावर घेण्याची ताकद फक्त आमच्यातच – निलेश राणे
- तुमच्या टॅकभर पुराव्याचे काय झाल? खासदार सुप्रिया सुळेंचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
- देगलूर विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार