चंद्रपूर : किरीट सोमय्या यांचे आरोप प्रसिद्धीसाठी असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे या चंद्रपूर दौ-यावर आहेत. तेथे त्यांनी किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले. सवंग प्रसिद्धीसाठी आरोप असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली
याआधीही आमच्यासंदर्भात तुमच्याकडे ट्रक भरून पुरावे असल्याची आठवण खासदार सुळे यांनी साेमय्या यांना करून दिली. खोटे आरोप केल्यास खूप प्रसिद्धी मिळते. त्यांना आनंद होतो. हा सेवाभाव आम्ही जोपासला असल्याचे मत खासादर सुळे यांनी व्यक्त केले. दरम्यान अजित पवार यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे इडी आणि आयकर खात्यास पाठवणार आहे. हे पुरावे खोटे असल्याचे खासदार शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी सिद्ध करावे असे आव्हान सोमय्यांनी आज साेलापूरात दिले हाेते. त्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत पवार कुटुंबियांतर्फे पहिली प्रतिक्रिया दिली.
पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पवार कुटुंबीयांचे कार्यालय तसेच घरांवर टाकण्यात आलेल्या धाडीवर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले. अजित पवार आणि मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडली, असं पवार 16 ऑक्टोबर रोजी म्हणाले होते. पवारांच्या याच वक्तव्याचादेखील सोमय्या यांनी आज समाचार घेतला. “मी पवारांना विचारतो. शिवालिक व्हेन्चर्स लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? त्याची अजित पवारांच्या बेनाई, नामी कंपन्यांमध्ये एन्ट्री लिहिलेली आहे. भविष्यात कधी अजित पवार आपल्या जमिनी विकणार, त्याचा अनसिक्योर अॅडव्हान्स हे 2008 च्या बुकमध्ये एन्ट्री झाली. परंतू त्यावर लिहिलं की यावर कोणतंही व्याज दिलं जाणार नाही. 100 कोटीची ती प्रॉपर्टी आज बाराशे कोटीची झालीय. त्यातील एक दमडी परत दिली का?’ असे किरीट सोमय्या म्हणाले.
Read Also :
- देगलूर विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? सोमय्याचा सवाल
- शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या चंद्रकात पाटलांच्या डोक्याची चौकशी करा – संजय राऊत
- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीच्या नेतृत्वात माजी आमदार विलास लांडेंना अखेर डच्चू?
- नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात अशा घटना घडतील की, आश्चर्य वाटेल – प्रकाश आंबेडकर