नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधील दुफळी उघड झाली आहे. माजी मंत्री व जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकीची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली
भास्करराव पाटील यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. पाटील हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार व राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत.
भाजपच्या महापौरांनी घेतला शरद पवारांचा आशिर्वाद; पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधान
भाजपातील एकाधिकारशाही, मित्रमंडळाचे वर्चस्व, निष्ठावंतांची मुस्कटदाबी व दलबदलुंना प्रोत्साहन यामुळे नांदेडची भाजप जणू चिखलीकरांची वैयक्तिक मालमत्ता झाली आहे. अशा ठिकाणी काम करणे माझ्या मनाला पटणारे नाही. त्यामुळे मी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी रविवारी पत्रकारपरिषदेमध्ये सांगितले.
पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
खतगावकर म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु, बेशिस्तीचा कळस गाठण्याचे काम भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यात केले आहे. ही बाब अनेकदा राज्याच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट चिखलीकरांना अधिक ताकद देऊन भारतीय जनता पक्षात होणाऱ्या अन्यायाला एकप्रकारे खतपाणी घातले. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवड़णुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरवताना माझे मत विचारात घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता खासदार प्रताप चिखलीकर यांच्या हट्टामुळे शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजे उमेदवार चिखलीकरांनी ठरवायचा आणि त्याच्या पराभवानंतर त्याचे सारे खापर माझ्यावर फोडायचे, असे कारस्थान चालू असल्याचे मला स्पष्ट दिसल्यामुळेच मी भाजपचा राजीनामा देत आहे” अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.
शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ तेलाची बाटली भेट!
भारतीय जनता पक्षाची नांदेड जिल्ह्यात जोमाने वाटचाल सुरु असताना शिवसेनेत कार्यरत असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपात घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या निष्ठावंतांवर अन्यायाची मालिकाच सुरु केली. अवघा पक्ष चिखलीकरांच्या दावणीला बांधला गेला. भाजपातील जुने व निष्ठावंत व आमच्या सारखी झोकून देऊन काम करणारी मंडळी बेदखल करण्याचे काम खासदार चिखलीकर यांनी सुरु केल्याचेही, भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगितले.
साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना – चित्रा वाघ
भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच भाजपमध्ये गेलेले माजी आमदार तथा भाजप कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड महानगर भाजपचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर सरजितसिंग गिल, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबाराव पाटील भाले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू गंदीगुडे, भाजप युवामोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पाटील खतगावकर, भाजप जिल्हा सचिव आनंदराव पाटील बिराजदार, बिलोलीचे माजी उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, भाजपचे उत्तर नांदेड विधानसभा माजी अध्यक्ष दीपक पावडी आदी प्रमुख पदाधिकारीही भाजपचा राजीनामा देत असून, ते देखील खतगावकर यांच्यासोबत काॅंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
Read Also :
- अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? सोमय्याचा सवाल
- शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या चंद्रकात पाटलांच्या डोक्याची चौकशी करा – संजय राऊत
- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीच्या नेतृत्वात माजी आमदार विलास लांडेंना अखेर डच्चू?
- नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात अशा घटना घडतील की, आश्चर्य वाटेल – प्रकाश आंबेडकर
- ‘यारी दोस्ती’, पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर करत खासदार खासदार सुजय विखे म्हणतात…