सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्या रक्तात आहेत. तीच ऊर्जा आमच्यात येते. त्यामुळेच सत्ता कोणाचीही असो, समोर विरोधक कितीही मोठा असो, त्याला अंगावर घेण्याची ताकद आमच्यात असते. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सावंतवाडीकरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे भावोद्गार भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली
येथील पालिकेच्या माध्यमातून पालिकेच्या शिवउद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
राणे म्हणाले, ‘‘नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सावंतवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे, ही सावंतवाडीकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. भावि पिढ्यांना महाराजांचा इतिहास कळावा. ते लोक कसे जगले असतील? कसे लढले असतील? यापासून प्रेरणा घेऊन पुढील पिढी आदर्श घडावी, यासाठी महाराजांचा हा पुतळा सावंतवाडीकरांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
Read Also :
- तुमच्या टॅकभर पुराव्याचे काय झाल? खासदार सुप्रिया सुळेंचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
- देगलूर विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? सोमय्याचा सवाल
- शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या चंद्रकात पाटलांच्या डोक्याची चौकशी करा – संजय राऊत
- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीच्या नेतृत्वात माजी आमदार विलास लांडेंना अखेर डच्चू?