पुणे : महानगरपालिकेने आमच्या भूमिकेशी खेळ करू नये असे केल्यात तीव्र विरोधात करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिला आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला भाजपकडून विरोध दर्शवण्यात आला आहे गेले दोन दिवस पवना जलवाहिनीचे काम सुरु आलस्याची माहिती समोर आली . यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना बाळा भेगडे म्हणले, या जलवाहिनीला भारतीय किसान संघ , काँग्रेस, रिब्लिकन पक्ष आणि शिवसेना या सर्व पक्षांनी विरोध करत आंदोलन केले होते. यात तीन शेतकऱ्यांचा दुरदैवी मृत्यू झाला त्यामुळे आमचा या प्रक्रल्पाला कालही विरोध होता , आजही आहे आणि उद्याही कायम राहील. महापालिकेने या प्रकल्पाच्या कामकाजाला सुरुवात केली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट आहे. शेतकरी व सर्व पक्षांशी चर्चा करून निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भेगडेंनी दिला