सिंधुदुर्ग : “माझ्या जीवनातील आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. अशावेळी कोणतंही राजकारण करू नये असं मला वाटतं होत. आपणं जावं, शुभेच्छा द्याव्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमातनळावरुन उडणारं विमान डोळे भरून पाहावं या स्तुत्य हेतूने आलो होतो, आहे. विमानतळ पाहिलं, विमान पाहिलं फार बरं वाटलं” असं नारायण राणे म्हणाले. चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. “मी मंचावर आलो. मंचावर येत असताना मुख्यमंत्री भेटले, माझ्या कानात काही बोलले, मी एक शब्द ऐकला” असो, असे नारायण राणे म्हणाले.
अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
“विमानतळ होणं आवश्यक आहे. प्रवाशांना सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. देशा-परदेशातील पर्यटकांनी पाच-सात दिवस इथे येऊन राहिलं पाहिजे. चार ते पाच लाख खर्च केले पाहिजेत. त्यातून सिंधुदुर्गातील उद्योजक-व्यावसायिकांना पैसे मिळाले पाहिजेत. आर्थिक समृद्धी जिल्ह्यात आली पाहिजे हाच विमानतळामागे माझा उद्देश होता” असे नारायण राणे म्हणाले.
प्रत्येक गोष्टीची नोंद होतेय, अपना टाईम भी आयेगा; संजय राऊतांच सुचक वक्तव्य
उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला. तेव्हा मी टाटाकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. 95 ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करु. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला. साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही.
Read Also :
- विमानतळ नको म्हणून आंदोलन करणारे आज मंचावर आहेत; नारायण राणेंचा रोख कुणाकडे?
- विमानतळाच्या उद्धाटनला शेजारी-शेजारी बसले; तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही
- ड्रग्ज पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्यासह तिघांना का सोडलं? नवाब मलिकांचा एनसीबीला सवाल
- बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येत आहे – नितेश राणे
- मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास टाळण्यासाठी नारायण राणे दुसऱ्याच विमानाने रवाना; मानपमान नाट्य थांबता थांबेना