सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर असल्याचे पाहायला मिळत आहेत. दोघांची खुर्ची देखील आजुबाजूलाच ठेवण्यात आली आहे. या दोघांनी दिपप्रज्वलन केले. मात्र एकमेकांकडे पाहिले देखील नाही.
राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात : बबनराव लोणीकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखिल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांनी खरे गुन्हेगार शोधावेत, अन्यथा…: मंत्री एकनाथ शिंदेंनी खडेबोल सुनावले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर हा सर्वश्रृत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्यातील वादाचा अनुभव आहे. आज अनेक वर्षांनंतर दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. दरम्यान या दोघांमध्ये संवाद होणार का? याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र दोघांनी एकमेकांना नमस्कारही घातलेला नाही. एकमेकांच्या बाजुला बसून देखील या दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही.
चिपी विमानतळाच्या उद्धाटन कार्यक्रमाचं विरोधी पक्षनेत्यांना साधं निमंत्रणही नाही; दरेकरांची नाराजी
नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दरम्यान हे दोघे आज एकाच व्यासपीठावर येतील. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. मात्र आता ते बॅकफूटवर गेले असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमात कोणतेही राजकारण करणार नसल्याचे नारायण राणेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य आमच्याकडून घडणार नसल्याचेही राणे म्हणाले आहेत.
Read Also :
- ड्रग्ज पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्यासह तिघांना का सोडलं? नवाब मलिकांचा एनसीबीला सवाल
- बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येत आहे – नितेश राणे
- मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास टाळण्यासाठी नारायण राणे दुसऱ्याच विमानाने रवाना; मानपमान नाट्य थांबता थांबेना
- अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर छापे
- जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आली आहे; गोपीचंद पडळकर कडाडले