नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर प्रचारासाठी गेले असताना त्यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भुकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे.
माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? – अजित पवार
बबनराव लोणीकर आज नांदेंड दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये बदल करायचा असेलं, चमत्कार करायचा असेल, हे सरकार घालवायच असेल, तर तुम्ही सुभाष साबणे यांना निवडणुक द्या. महाराष्ट्रामध्ये मोठा चमत्कार होणार आहे. शिवसेनेचे १२ आमदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच पडेल, हे सरकार त्यांच्या बहिमानीने पडेल, असे वक्तव्य लोणीकर यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
राणेंना डच्चू: मुनगंटीवार, शेलार, गावित, वाघ यांना भाजपकडून बढती; पक्षाने सोपविली मोठी जबाबदारी
शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.
Read Also :
- वादाची ठिणगी: संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली नोटीस; म्हणाले, माफी मागा, अन्यथा…
- अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
- केंद्रीय तपास यंत्रणांनी खरे गुन्हेगार शोधावेत, अन्यथा…: मंत्री एकनाथ शिंदेंनी खडेबोल सुनावले
- चिपी विमानतळाच्या उद्धाटन कार्यक्रमाचं विरोधी पक्षनेत्यांना साधं निमंत्रणही नाही; दरेकरांची नाराजी
- दिल्लीच्या तख्तापुढं सह्याद्री झुकला नाही, झुकणार ही नाही – सुप्रिया सुळे