मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी पीएमसी बॅंक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते संजय राऊत कुटुंबीयांना मिळाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केला होता. याप्रकरणी संजय राऊत यांनी चंद्रकात पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
राणेंना डच्चू: मुनगंटीवार, शेलार, गावित, वाघ यांना भाजपकडून बढती; पक्षाने सोपविली मोठी जबाबदारी
यासंदर्भात ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. “माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिप्पण्या केल्याबद्दल चंद्रकांतदादा पाटील यांना मी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. जर चंद्रकांत पाटील यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन”, असे ट्विट संजय राऊत यांनी म्हटले आहे.
धाडी टाकून आमच्या नेत्यांची बदनामी, भाजपाने राष्ट्रवादीचा इतका धसका का घेतलाय? – जयंत पाटील
दरम्यान, तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे म्हटले होते. तसेच संजय राऊत हे सातत्याने माझ्यावर टीका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. याशिवाय, संजय राऊत हे शिवसेनेचे नुकसान करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
I have issued a legal notice to Chandrakantdada Patil for his defamatory, baseless and bogus comments against me and my wife. If Chandrakant dada doesn’t give an unconditional apology..I will be taking further legal action and move the honourable court
जय महाराष्ट्र!! pic.twitter.com/tHD6O8rIRR— Sanjay Raut (@rautsanjay61) October 8, 2021
तुम्ही अग्रलेखात लिहिले की, “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?” संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
Read Also :
- अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
- केंद्रीय तपास यंत्रणांनी खरे गुन्हेगार शोधावेत, अन्यथा…: मंत्री एकनाथ शिंदेंनी खडेबोल सुनावले
- चिपी विमानतळाच्या उद्धाटन कार्यक्रमाचं विरोधी पक्षनेत्यांना साधं निमंत्रणही नाही; दरेकरांची नाराजी
- दिल्लीच्या तख्तापुढं सह्याद्री झुकला नाही, झुकणार ही नाही – सुप्रिया सुळे
- …अन् लोकांनी भाजपला येडी ठरवलं; ‘तो’ किस्सा सांगताना शरद पवारांना गुदगुल्या