ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. या विषयावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही अनेक वर्षे सत्तेत राहिला. सूडाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार ही नाही. (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही विरोधकांना कधी शत्रू मानले नाही आणि मानणार ही नाही ही आमची संस्कृती नाही.
धाडी टाकून आमच्या नेत्यांची बदनामी, भाजपाने राष्ट्रवादीचा इतका धसका का घेतलाय? – जयंत पाटील
ज्यांच्यावर हे धाडसत्र सुरु आहे. ते केवळ दादांचे नातेवाईक नाहीत तर आमचे देखील नातेवाईक आहेत. आमचे एकत्र कुटुंब आहे. संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्रचा सह्याद्री दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि झुकणार ही नाही असे खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न, कोणी केला हल्ला?
दरम्यान आयकर भरले जात नाही का या प्रश्नावर सुळे म्हणाल्या जे धाडी टाकतात त्यांनाच विचारा. राजकीय सूड उगवला जात आहे का? महाराष्ट्रातील हे राजकारण अपेक्षीत आहे का? यावर सुळे म्हणाल्या आम्ही असले राजकारण केले नाही. आम्ही अनेक वर्षे सत्तेत राहिलाे. सूडाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार ही नाही. (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही विराेधकांना कधी शत्रू मानले नाही आणि मानणार ही नाही ही आमची संस्कृती नाही असेही खासदार सुळेंनी नमूद केले.
Read Also :
- …अन् लोकांनी भाजपला येडी ठरवलं; ‘तो’ किस्सा सांगताना शरद पवारांना गुदगुल्या
- प्रत्येक गोष्टीची नोंद होतेय, अपना टाईम भी आयेगा; संजय राऊतांच सुचक वक्तव्य
- ड्रग्स पार्टीत भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणाही सामील; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
- पार्थ पवारांच्या कार्यालयावर तब्बल २८ तासापासून ईडीची छापेमारी; पवार कुटूंबीय गोत्यात येणार?
- …अन् भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले!