मुंबई : एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह ८ ते १० लोकांना ताब्यात घेलल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली होती. मात्र ताब्यात घेतलेल्या १० पैकी २ लोकांना सोडून देण्यात आलं होतं आणि त्यातला एकजण हायप्रोफाईल भाजप नेत्याचा मेहुणा असल्याचा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ पुराव्यांसह आपण त्या अधिकाऱ्याचं नाव जाहिर करणार असल्याची माहिती त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
जरडेंश्वर कारखान्यांवर आयटीचा छापा; अजित पवारांच्या निकटवर्तींयांवर कारवाई?
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे. एक अधिकारी आठ ते दहा जणांना ताब्यात घेतलं असं सांगतो, एकतर आठ असेल किंवा दहा असेल. दहापैकी दोघांना का सोडलं आणि समीर वानखेडे यांनी कोणत्या भाजप नेत्याच्या फोनवरुन दोघांना सोडलं हे उद्या पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचं ते म्हणाले. त्याचप्रमाणे कलाकारांवर प्रचंड दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप त्यांनी केला.
I am collecting more data and information to expose the wrongdoings of the NCB and therefore I am rescheduling my Press Conference
It will now be held on,
Date:- 9th October 2021 (Saturday)
Time:- 12 pm
Venue:- Rashtrawadi Bhavan,Ballard Estate,Mumbai
Sorry for the inconvenience— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 7, 2021
उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या कारवाईबाबत ते म्हणाले की, आयकर खात्याचा वापर करुन अजित पवारांना बदनाम केलं जातंय. पवारांच्या नातेवाईकांवरील कारवाई सुडबुद्धीने केली जातेय. लोकांना धाकात आणि घाबरवून ठेवण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय असंही मलिक म्हणाले. त्याचप्रमाणे आम्ही कारवाईला घाबरत नसून सरकारचं काम जोरदार सुरु आहे. जर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष होणार असेल तर होउद्या आम्ही तयार आहोत असं आव्हानच त्यांनी विरोधकांना केलं आहे.
मंत्रीपद गेलं तेल लावतं, उद्याचं राजीनामा फेकून मारतो; बच्चू कडू संतापले
उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांचे बँक घोटाळे बाहेर काढणार आणि एनसीबी विरुद्ध पुरावे सादर करणार तसेच एनसीबीनं छापेमारी करत ताब्यात घेऊन सोडून दिलेल्या दोघांची नावे जाहिर करणार सोबतच त्या हायप्रोफाईल भाजप नेत्याचंही नाव जाहिर करणार असल्याचा माहितीवजा इशारा नवाब मलिक यांना दिला आहे.
Read Also :
- पार्थ पवारांच्या कार्यालयावर तब्बल २८ तासापासून ईडीची छापेमारी; पवार कुटूंबीय गोत्यात येणार?
- …अन् भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले!
- पाहुणे घरात आहेत, ते गेल्यावर भूमिका मांडतो; ईडीच्या धाडीवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया
- देगलूर पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील; अब्दुल सत्तारांची तोफ धडाडली
- कारखान्यांवरील आयकर विभागाच्या छाप्यासंबंधी रोहित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, कालच…