पुणे : राज्यातील साखर कारखान्यांवर आयकर विभागानं मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागानं राज्यातील पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे चालवण्यासाठी आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. ईडीनं यापूर्वीचं जरंडेश्वर साखर कारखाना यापूर्वी सील केलेला आहे.
कोरोनाचे संकट कायमसाठी जाऊ दे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना
आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागानं कारवाई केलेले साखर कारखाने हे अजित पवारांच्या निकटवर्तींयांचे असल्याची माहिती आहे. बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापे टाकले आहेत. हे छापे नेमके ईडी किंवा आयकर विभागाचे आहेत हे अद्याप समजलेले नाही. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे.
Read Also :
- जिल्हा परिषदेतच जाऊ द्या, पुढच्या निवढणुकीत घवघवीत यश मिळवू – अजितदादांचा विश्वास
- नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो – नरेंद्र मोदी
- जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही भाजपाचा पहिला क्रमांक कायम, कार्यकर्त्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील
- नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का: काँग्रेसला घवघवीत यश, राष्ट्रवादीला मात्र दोनच जागांवर मानावे लागले समाधान
- मंत्रीपद गेलं तेल लावतं, उद्याचं राजीनामा फेकून मारतो; बच्चू कडू संतापले