पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल स्पष्ट झाले. या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठं यश मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
कोरोनाचे संकट कायमसाठी जाऊ दे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना
जिलहा परिषदेच्या 85 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 33 जागा जिंकल्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 17 जागा जिंकल्या. शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी महाविकास आघाडीने 73 जागा जिंकल्या तर भाजपला 33 जागांवर यश मिळालं. अनेक जागांवर अनपेक्षित निकाल लागले. कुठे राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला, तर कुठे सर्वसामान्य उमेदवारांनी दिग्गजांना धूळ चारली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरात्रोत्सवाचं निमित्त साधून आज मुंबईत देवाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर बाचचित केली. झेडपी निकालावर प्रतिक्रिया देताना या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, असं अजित पवार म्हणाले.
अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडी असली तरी आम्ही वेगवेगळं लढलो होतो, अशी आठवण यानिमित्ताने अजित पवार यांनी करुन दिली. आमच्या तिघांची मतं पाहिली तर ती निश्चित जास्त होतात. प्रत्येकाला वाटत होतं निवडणूक होऊच नये. कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीसारख्या जाहीर सभा घेता येत नव्हत्या. मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड होतं. परंतु या सगळ्या वातावरणात जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. जनतेनं समाधानकारक निकाल दिला आहे. पण असं असलं तरी मी आनंदी पण नाही आणि दु:खी पण नाही”, असं अजित पवार म्हणाले.
Read Also :
- नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो – नरेंद्र मोदी
- जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही भाजपाचा पहिला क्रमांक कायम, कार्यकर्त्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील
- नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का: काँग्रेसला घवघवीत यश, राष्ट्रवादीला मात्र दोनच जागांवर मानावे लागले समाधान
- मंत्रीपद गेलं तेल लावतं, उद्याचं राजीनामा फेकून मारतो; बच्चू कडू संतापले
- संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट, कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही; राष्ट्रवादीच्या गौप्यस्फोटाने खळबळ