मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढले. भाजपने या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीही आपणच मोठी आघाडी ठरल्याचा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यावर बच्चू कडू यांनी आमिष घेतल्याचं सिद्ध करा, राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेलं ते राजकारण असा हल्लाबोल केला. आमिषाला बळी पडल्याचं सिद्ध करा, उद्या राजीनामा फेकतो, मला गरज नाही त्याची असं बच्चू कडू म्हणाले.
भाजपाने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे, हा माज जनतेनेच उतरविला पाहिजे – सचिन सावंत
महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र इथून पुढे सर्वांनी विशेषता महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील, महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी जर एकत्र आली नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण यश मिळवू शकणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.
अजितदादा, पालकमंत्री बच्चू कडू यांना समज द्या, अन्यथा…- अमोल मिटकरी
अमोल मिटकरी हा मोठा माणूस आहे. त्यांनी काय आरोप केला आहे तो मोठा माणूस आहे. मी आमिष घेणारी औलाद नाही. दबावाला बळी पडणारा मी नाही. तिथे भाजपचा उमेदवार होता, त्यांनी मला समर्थन कसं दिलं ते मला माहिती नाही. त्यामुळे आमिष दाखवणं, बळी पडणं हे बच्चू कडूंची औलाद नाही. त्यांनी सिद्ध करावं, मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं. हवेतले आरोप करु नयेत, हे बंद करा, असं बच्चू कडू म्हणाले.
Read Also :
- संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट, कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही; राष्ट्रवादीच्या गौप्यस्फोटाने खळबळ
- अमोल मिटकरींना मोठा धक्का: गावातच झाला पराभव, बच्चू कडू यांच्या प्रहारचा फटका
- अकोल्यात वंचित बहुजन आघाडीची मुसंडी; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी गेली कोमात
- धक्कादायक: राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा मुलगाच सापडला बेटिंग प्रकरणात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- शिवसेना खासदारपुत्राचा दारूण पराभव; भाजप उमेदवार कोरेंनी चारली धुळ, शिवसेनेत बंडखोरीची शक्यता